आय. टी त मराठी, ऐटीत मराठी ( IT Marathi )
Easy way to use information technology to simplify work

आय. टी त मराठी, ऐटीत मराठी ( IT Marathi ) udemy course
Easy way to use information technology to simplify work
मराठी राजभाषा दिनानिमित्त MKCL तर्फे ‘आय.टी.त मराठी, ऐटीत मराठी’ ही कार्यशाळा udemy वर देण्यात आली आहे.
जागतिकीकरणाच्या या जमान्यात मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी, विकासासाठी, समृद्धीसाठी, अस्मितेसाठी, आणि उन्नतीसाठी योजिलेली ही कार्यशाळा सर्वांना दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त आहे.
कार्यशाळेतील काही ठळक शिक्षणक्रम:
§ मोबाईलवर अथवा कंप्यूटरवर मराठीत बोलून संदेश लिहिणे - Voice Typing
§ मराठीतून रेकॉर्ड केलेले संभाषण आपोआप टाईप होणे- Transcription
§ मराठीतून इतर कोणत्याही भाषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मराठी भाषांतर करणे – Translate
§ जुन्या मराठी पानांच्या फोटोवरून त्याचे टेक्स्ट मिळविणे- Image to Text
§ मराठीतून टाईप करणे, ऑनलाईन अर्ज भरणे, मराठी वर्तमानपत्र ऑनलाईन वाचणे, सोशल मीडियावर मराठी वापरणे, मराठी भाषकांसाठी विविध उपयुक्त अॅप्स , शब्दकोश, इ.
विविध आयटी सुविधा व टूल्स आपण मराठी भाषेतून वापरली तरच जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषा जगात ऐटीत राहू शकेल म्हणून ‘जर ‘आयटी त मराठी (तरच) ऐटीत मराठी’!